हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
यड्राव येथील बौद्ध विहार येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रा . प . सद्स्य मंगल कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच माजी सरपंच उल्हास भोसले डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .
यावेळी ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , मेजर अक्षय भोसले , गुरुनाथ ढोबळे , सर्जराव कांबळे , प्रकाश भोसले , प्रसाद पोवार , राकांबळे , निखिलराज कांबळे व समाज बांधव उपस्थित होते . तसेच ग्रामपंचायत कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच कुणालसिंह नाईक -- निबांळकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी ग्रा . प . सद्स्य महेश कुंभार , बाबासो राजमाने , रंगराव कांबळे , हरीष नाईक , सारंग काकडे , मंगल कांबळे (ग्रा . प . सद्स्या ) , दतात्रय साळुंखे , ए . जी . मुल्ला सर , ग्रामविकास अधिकारी व्ही . व्ही . गावडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .