इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी : २६ जुन राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द ठरविण्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी सेल च्या वतीने कॉ. के. एल. मलाबादे चौक येथे लक्षणीय चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी आपल्या भाषणामध्ये राज्यशासनाने ओबीसी समाजाची जिल्हा निहाय माहिती (इम्पेरिकल डाटा) न्यायालयासमोर योग्यरीतीने न मांडल्यामुळे हे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण याठिकाणी रद्द झाले आहे. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओ बी सी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली होती. त्याची न्यायालयीन लढाई सुरु होती. सर्वोच्च न्यायालयाने तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला वेळोवेळी सूचना देवूनही राज्यशासनाने या गोष्टींकडे कानाडोळा केला त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यास फक्त आणि फक्त हे आघाडी सरकार जबाबदार आहे. आदी गोष्टींचा उल्लेख केला. आंदोलनावेळी ओबीसी समाजाचे तथा भाजपा ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे म्हणाले राज्यशासनाने ओबीसींची जातनिहाय जनगणना करून ओबीसी महाज्योती संस्थेला १००० हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात द्यावा. त्याचबरोबर न्यायालयात आरक्षणासंदर्भात जी पुनर्विचार याचिका दाखल करायची आहे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता राज्यसरकारने त्वरित करावी. तसेच मंत्रिमंडळात असलेले मंत्री छगन भुजबळ व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ओबीसी समाजाच्या या चळवळीमध्ये समाविष्ट होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू , मामा जाधव आणि वृषभ जैन यांनीही आघाडी सरकारचे वाभाडे काढले. यावेळी " ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान में", "ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो", "इम्पेरीकल डाटा सादर न करणाऱ्या ठाकरे सरकारचा धिक्कार असो" आदी घोषणांनी मलाबादे चौक दणाणून सोडला. अशा रीतीने सदर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, ओबीसी आघाडी अध्यक्ष पवन कुंभार, सरचिटणीस अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, राजेंद्र पाटील, शहाजी भोसले, भरत जोशी, अतुल गोरे, सौ. विजया पाटील, सौ. पुनम जाधव, सौ. अश्विनी कुबडगे, सौ. अलका विभुते, सौ. योगिता दाभोळे, सौ. अनिता कुरणे, सौ. निर्मला मोरे, सौ. सरला घोरपडे, सौ. शोभा वसवाडे, गंगा पाटील, नगरसेवक किसन शिंदे, मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, प्रसाद खोबरे, दिपक राशिनकर, किरण दंडगे, पांडुरंग म्हातुकडे, रामसागर पोटे, बी डी पाटील, विनोद कांकाणी, बाळकृष्ण तोतला, सुधीर पाटील, श्रीकांत शिंदे, सतीश नर्मदे, प्रमोद बचाटे, अरविंद चौगले, नामदेव सातपुते, दौलत पाटील, दिपक तेलवे, प्रविण रावळ, सागर कचरे, प्रशांत नवनाळे, आण्णा आवळे, दिपक पाटील, मयूर दाभोळकर, आशिष खंडेलवाल, रमाकांत साळी, शफिक बागवान, राजाराम पोवार, उत्तम कुंभार, विठ्ठल तारळेकर, शिवदीप बंडगर, प्रदीप माळगे, इलाई नायकवडे, राजु पुजारी, अर्जुन शिंदे, शंकर झित्रे, विकास बनसोडे, मनोज तराळ, विपुल खोत, आकाश माने, सुनिल काडापा, प्रविण जाधव, महंमदपाशा नसरद्दी, रवि पाटोळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.