हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
लॉकडाऊन मुळे आम्ही गेल्या वर्षभरापासून घरातच बसून आहोत कामधंदा नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती .अशा संकट परिस्थितीत अरिहंत उद्योग समूह आम्हाला मानसिक आधार देण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तू देऊन आमचे संकष्ट दूर केले आहे. शासन पोहोचण्या आधीच संस्थेने या ठिकाणी धावून आम्हाला मदत केल्याने कोरोणा व लॉकडाऊन मध्ये आम्हाला आज अरिहंत चाच आधार असल्याचे मत भटकी जाती जमातीचे पिंटू दुर्गमुर्गी यांनी व्यक्त केले.
लाकडाउन मुळे गेल्या वर्षभरापासून घरात बसून राहिलेल्या बोरगाव शहरातील सुमारे चाळीसहून अधिक भटकी जाती-जमाती कुटुंबांना अरिहंत उद्योग समूहाने जीवनावश्यक वस्तूचे कीट वितरण करून त्याला आधार दिला आहे.
बोरंगाव शहरामध्ये रोजीरोटी वर जगणारे सुमारे चाळीसहून अधिक कुटुंबे भटकी जाती जमाती आहेत. या बरोबरच अनेक कामे करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. शहरातील बसस्थानक शेजारी व वाल्मीक मंदिर शेजारी भटके जाती जमातीचे कुटुंब वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षभरापासून ते अनेक अडी-अडचणी मात करीत आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या यांना शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही.गेल्या वर्षभरापासून लाकडाऊन झाल्यामुळे हे कुटुंब घरीच थांबून आहेत .खायला अन्न नसल्याने कुटुंब चालवणे कठीण पडले होते. शासनाकडून काही आपणास मदत मिळेल ह्या आशेने येथील भटकी जाती जमातीचे लोक जीवन जगत आहेत .पण आज अखेर शासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही. गेल्या तीस वर्षापासून हे लोक झोपडीत वास्तव्य करीत आहेत .अशा लोकांची अडचणी समजून युवा नेते उत्तम पाटील यांनी मोफत गॅस, रेशन कार्ड, वीज कनेक्शन देण्याबरोबरच लाकडाउनच्या परिस्थितीची जाणीव ठेवून या लोकांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांना एक महिना पुरेल इतके मोफत रेशन चे वाटप केले आहेत. पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, पाच किलो साखर ,पाच किलो ज्वारी, एक किलो तेल, चहा पूड हे रेशन देऊन अरिहंत उद्योगसमूहांनी सर्वांना एक चांगला संदेश दिला आहे.युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांनी आपल्या अरिहंत उद्योग समुहा मार्फत एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.नगरसेवक अभयकुमार मगदूम, माणिक कुंभार ,माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी. के.महाजन,अशोक माळी,पिंटू दुर्गमुर्गी, लक्ष्मण दुर्गमुर्गी,मारुती दुर्गमुर्गी,रमेश दूर्गमुर्गी,बाळू दुर्गामुर्गी,अशोक दूर्गामुर्गी,दीपक दुर्गमुर्गि यांच्यासह अरिहंत उद्योग समूहाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ.
बोरगाव येथील झोपडपट्टी वसाहतीतील भटक्या जाती कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करताना पृथ्वीराज पाटील. शेजारी अभयकुमार मगदूम , माणिक कुंभार ,अशोक माळी बी.के महाजन व मान्यवर.