इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शनिवार दि.२६ जून रोजी लोकराजा राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील  छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णा कृती पुतळ्यास प्रभारी मुख्य अधिकारी तथा अप्पर तहसिलदार शरद पाटील यांच्या हस्ते आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर , नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी व उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

          याप्रसंगी पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, शशांक बावचकर, राहुल खंजीरे, विठ्ठल चोपडे, राजु बोंद्रे, किसन शिंदे,माजी उप नगराध्यक्ष रवी रजपुते, कामगार अधिकारी विजय राजापुरे, लेखापरीक्षक नितीन सरगर,  जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव शिंदे, उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, संजय शेटे, प्रसाद पळसुले, संजय कांबळे, भारत कोपार्डे ,सचिन शेडबाळे आदी  उपस्थित होते.


       

  

Post a Comment

Previous Post Next Post