इचलकरंजी : डॉ. आनंद कोळी ( एम.डी.मेडिसिन ) इचलकरंजी हे वयाच्या सत्तरावा वर्षी बुधवार ता. २३ जून २०२१ रोजी कालवश झाले.इचलकरंजी शहरामध्ये गेली चाळीस वर्षे ते प्रॅक्टिस करणारे एक ज्येष्ठ डॉक्टर होते. ते सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा माझा जिव्हाळ्याचा स्नेह होता.डॉ.आनंद कोळी मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे (माई ) चे माजी अध्यक्ष होत. डायबेटिक असोसिएशन इचलकरंजीचे संस्थापक होते. निरामय हॉस्पिटलचे संचालक होते.तसेच त्यांच्या 'सोनाई हॉस्पिटल ' द्वारे ते व त्यांच्या पत्नी डॉ.आरती कोळी ( एम.बी.बी.एस.)सेवा देत होते. अतिशय उमद्या , हळव्या स्वभावाच्या डॉ.आनंद कोळी यांच्या निधनाने वैद्यकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.डॉ.आनंद कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
Tags
Latest