शाहूराजांनी चातुर्वण्य व्यवस्थेविरोधात उठविलेला कृतिशील आवाज आणि सहकारापासून शिक्षणापर्यंत केलेली सामाजिक उभारणी आजही अतिशय महत्त्वाची आहे....रणजीत यादव



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी ता.२७ लोकराजे शाहू महाराजांनी सनातन्यांशी दोन हात करण्यासाठी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. तसेच बहुजन वर्गाला वर्णव्यवस्थेच्या जोखडातून सोडवण्यासाठी बहुमोल प्रयत्न केले. शाहूराजांनी चातुर्वण्य व्यवस्थेविरोधात उठविलेला कृतिशील आवाज आणि सहकारापासून शिक्षणापर्यंत केलेली सामाजिक उभारणी आजही अतिशय महत्त्वाची आहे,तो विचार वारसा घेऊन आपण पुढे गेले पाहिजे  असे विचार प्रबोधिनीचे कार्यकर्ते व बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक रणजीत यादव यांनी व्यक्त केले आले. ते समाजवादी प्रबोधिनी व  प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.प्रारंभी रणजित यादव यांच्या हस्ते राजर्षी शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे,सचिन पाटोळे, नौशाद शेडबाळे आदींनीही चर्चेत सहभाग घेतला.

चर्चेचा समारोप करताना सचिन पाटोळे यांनी राजर्षींच्या विविध क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करून राजर्षिनी आपल्या संस्थानातील जनतेच्या आरोग्यसुविधेसाठी केलेले कार्य आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समजून घेणे गरजेचे आहे.

या चर्चेतून शाहूंराजांच्या कार्याच्या समकालीन संदर्भाचा सविस्तर उहापोह करण्यात आला.कोरोनाचे सर्व नियम पाळून झालेल्या या कार्यक्रमात प्रबोधिनीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 फोटो : शाहूंराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना रणजित यादव सोबत सचिन पाटोळे,प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे आणि नौशाद शेडबाळे

Post a Comment

Previous Post Next Post