प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी गावभागातील जुना नदीवेस नाका परिसरात असलेल्या पुरातन संस्थाकालीन श्री मरगुबाई मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात येत आहे. या जिर्णोध्दार कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.*
*सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून ओळखल्या जाणार्या गावभागातील पुरातन मंदिरांपैकी श्री मरगुबाई मंदिर आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे सुमारे 50 वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या सुशोभिकरणासह जिर्णोध्दार करण्यात यावा यासाठी मंदिर समितीसह भागातील नगरसेवक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेत सुवर्ण जयंती नगरोत्थान अनुदान अंतर्गत जिर्णोध्दारासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी नगराध्यक्षा ॲड सौ.अलका स्वामी यांचे सह सभापती उदयसिंह पाटील याचे मोलाचे सहकार्य लाभलेने भागातील नागरीकानकडुन समाधन व्यक्त होत आहे . या मंदिराच्या जिर्णोध्दार कामाचा शुभारंभ शुक्रवारी नगराध्यक्षा सौ. स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.*
*यावेळी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, नगरसेवक प्रकाश पाटील, पै. अमृत भोसले, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, संजय बेडक्याळे, अरविंद शर्मा आदींसह मंदिरातील पुजारी, भागातील नागरिक व बागडी समाजातील मान्यवर उपस्थित होते. या कामाचे लक्ष्मी बालाजी ट्रेडर्स हे मक्तेदार आहेत.*