तारदाळ प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे :
इचलकरंजी तालुका हातकणंगले येथे ऑल इंडिया ह्युमन राईटस संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. श्री निरज आहुजा यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले देशात काेव्हीड -19 या राेगाने गेले एक वर्षाहून अधिक काळ थैमान घातले असून अजूनही काेराेना हा राेग नियंत्रित आलेला नाही या कालावधीत सरकारने लाॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे कोणताही व्यवसाय व उद्योग धंदा सुरळीत नव्हता व नाही अशा स्थितीत एम एस ई बी महामंडळाचे वसुली अधिकारी नागरिकांना विद्युत बिल तातडीने भरणे बाबत तगदा लावत आहेत तसेच विद्युत बिल न भरल्यास कनेक्शन बंद करण्याची धमकी देत आहेत अशा प्रकारामुळे नागरिकांच्या मध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे विद्युत महामंडळ ही सेवा देणारी कंपनी असून वीज बिलाचा जाे स्थिर आकार आहे ताे कायमपणे बंद करणे गरजेचे आहे.ताे बेकायदेशीर आहे तसेच विधुत महामंडळ ही सेवा देणारी कंपनी असल्यामुळे व्याज आकार देखील रद्द करणे गरजेचे आहे सदर स्थिर आकाराचे व व्याज आकाराचे बिलामुळे विजबील जास्तीचे दिसून येते त्यामुळे जो स्थिर आकार व व्याज आकार विद्युत महामंडळ घेत आहे तो बेकायदेशीर असल्यामुळे आज तागायत नागरिकाकडून घेतलेला स्थिर आकार व व्याज आकार परत करणेत यावा. यामध्ये लोकांची थकीत वीज बिल फेड होणार आहे. तरी या बाबतची गंभीरतेने दखल घ्यावी. अजून सुद्धा राज्यात लॉकडांऊनची अंमलबजावणी चालू अजून उद्योगधंदे पूर्णता चालू नाहीत व लोकांना रोजगार नाही या परिस्थितीत विद्युत महामंडळने एक तर सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे अगर विज बिल भरणेचे चार हफ्त्याची सवलत देणे आवश्यक व गरजेचे आहे या मागणीवर विचार विनिमय होऊन तोडगा निघाले शिवाय कोणत्याही नागरिकाकडून वीज बिलाची मागणी करण्यात येऊ नये.असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ऑल इंडिया ह्युमन राईटसचे जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे. एल.बी.पारीख. प्रकाश गुरव. सुनिल पुजारी. विजय कचरे. संजय तिपे. श्रीकांत कांबळे. संतोष निलाखे.मेहबूब मुजावर. गुरुप्रसाद आरभावे. अरबाज शेख. दिलीप रेपे. इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.