समाजकार्य पदवी धारकांच्या शासकीय जागांची पात्रता बदलणारा निर्णय त्वरित मागे घ्यावा. समाजकल्याण सहायक आयुक्त यांना निवेदन सादर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  महाराष्ट्रामध्ये 56 हुन अधिक समाजकार्य शिक्षण देणारी महाविद्यालये असून यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याकारणाने हे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय, निमशाकीय व स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून  शासकीय खात्यातील समाजकार्य  पदवीधारकांसाठी राखीव असलेल्या विविध जागांबाबत शासनस्तरावर अन्यायी भूमिका घेतली जात आहे. यामुळे  राज्यस्तरावर विविध जिल्ह्यांमध्ये कृती समित्या स्थापन झाल्या असून शासनाच्या या अन्यायकारक धोरणाला विरोध  करण्यासाठी कोल्हापुरातील समाजकार्य शिक्षण बचाव कृती समिती चे सदस्य मयूर कुकडे, रामेश्वर राजगुरू, बिपीन पोवार व प्रणित घाटगे यांनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. विशाल लोंढे यांना याबाबतचे निवेदन देऊन विविध बाबींवर चर्चा केली. येणाऱ्या काळात शासनस्तरावर याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post