सदलगा पोलिस स्टेशनमध्ये नवीन पी.एस.आय कुमार हित्तलमणी यांची नियुक्ती






विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

 बेडकिहाळ :     दि -27 रोजी पासुन सदलगा पोलिस स्टेशनमध्ये नवीन पी.एस.आय.कुमार हित्तलमणी हे रुजु झाले. त्यावेळी त्यांचा सत्कार करताना शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार, विक्रम शिंगाडे हे त्यांचे सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिंगाडे व अनेक पत्रकार उपस्थित होते. तसेच अगोदरचे  पी.एस.आय. आर.वाय बिळगी  यांची सुध्दा ट्राफीक पोलीस इन्स्पेक्टर, चिकोडी येथे बदली झाल्यामुळे त्यांचा व नवीन पी.एस.आय.कुमार हित्तमणी यांना शाल, श्रीफळ,गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post