हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
जयसिंगपुर नगर पालिकेच्या हद्दीत स्मशानभुमी नसल्याने येथील प्रेतांवर उदगाव हद्दीतील अंकली टोल नाक्यावरील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करावे लागतात . जयसिंगपुर सारख्या प्रगत शहरात स्मशानभुमी नसणे ही अत्यंत खेदाची आणि दुर्देवाची गोष्ट आहे.
तसेच जयसिंगपुर नगरपरिषद हद्दीतील बेवारस प्रेतांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचीही कोणतीच सोय नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने व अंकली टोल नाक्यावरील स्मशानभुमीत खाजगी लाकुड वखारीचा ठेका दिल्याने येथे एक मण लाकडा साठी ३५० रूपये द्यावे लागतात. एक प्रेत जाळण्यासाठी ८ ते ११ मण लाकडे लागत असल्याने एका प्रेतासाठी ३ ते ४ हजार रूपये मोजावे लागतात. म्हणून ही सर्वात महागडी स्मशानभुमी मानली जात आहे. जयसिंगपुर नगरपरिषदेकडे बेवारस प्रेतावर अत्यंविधीची कोणतीच सोय नसल्याने व अंकली टोल नाक्यावरील महागड्या लाकडासाठी बेवारस प्रेत अंत्यविधीच्या प्रतिक्षेत अनेक तास पडुन रहात असलेने बेवारस प्रेतांची विटंबना होत आहे.
म्हणुन राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाने जयसिंगपुर नगरपरिषदच्या मुख्याधिका-यांना निवेदन देऊन आठ दिवसांत जयसिंगपुर शहरात स्मशानभुमीचे शेड उभारावे , सर्वांनाच अगदी माफक दरामध्ये अंत्यविधीसाठी लाकडे व शेणी उपलब्ध करून द्यावे. तसेच नगरपरिषदेने बेवारस प्रेतांवर मोफत अत्यंविधी करावा अशा मागणीचे निवेदन दिले आहे.. व मागणी मान्य न झालेस दि. २३/६/२०२१ रोजी नगरपरिषदे समोर राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे पदाधिकारी जिवंत समाधी घेणार असल्याचे जाहिर केले आहे*.
सदर निवेदनाच्या प्रती कोल्हापुर जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस प्रमुख , शिरोळ तहशिलदार , डी. वाय. एस . पी. जयसिंगपुर विभाग , पोलीस निरीक्षक - जयसिंगपुर यांना देण्यात आल्या आहेत..