हुपरी येथील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन...




   हुपरी येथील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की  दिनांक 12/06/2021 व 13/06/2021 या दोन्ही दिवशी शहरातील सर्व भाजीपाला, फळे, आदि विक्रीचा बाजार पूर्णत: बंद राहील. फक्त अत्यावश्यक सेवा (हॉस्पीटल व मेडीकल) पूर्ण वेळ सुरू राहतील. किराणा दुकाने फक्त सकाळी ७ ते दुपारी ४ अखेर सुरू राहतील. तर हॉटेल, बेकरी, डेअरी हे व्यवसाय फक्त पार्सल सुविधा सुरू राहील, या व्यतिरिक्त कोणताही व्यवसाय, आस्थापना सुरू राहणार नाही. जीम, क्रीडांगण, सकाळी, संध्याकाळी फिरायला जाणे आदी गोष्टीना निर्बंध आहेत. सदर दोन दिवस फक्त अत्यावश्यक हॉस्पीटल. मेडीकल. किराणा, हॉटेल, बेकरी. डेअरी यांनी वरील वेळेतच सुरू राहतील. इतर सर्व व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आस्थापनां यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.                                    

आपली नगरपरिषद . हुपरी.

Post a Comment

Previous Post Next Post