अप्पासाहेब भोसले :
यड्राव व परिसरामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून पाणीपुरवठा च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना पाणी पाणी म्हणायची वेळ आली आहे याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नेमकी पाणीपुरवठ्याची व्यवस्था व जबाबदार कोण आहे हेच कळत नाही आहे. नागरिकातून पाणी कधी येणार याबाबत नागरिकांचे विचारणा होत आहे याचे उत्तर कोणालाच मिळत नाही आहे हे नेमकं असे किती दिवस चालणार अजून? त्यासाठी तातडीने पाणीपुरवठा समितीची स्थापना करणे गरजेचे आहे व त्याच्या वर जबाबदारी देणे गरजेचे आहे.त्यात ही बेघर गावठाण येथे पाण्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे याप्रश्नी ग्रामपंचायत प्रशासनाने अतिशय संवेदनशील होऊन हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.