मयत युवक - प्रशांत भोसल
हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
यड्राव ता. शिराेळ येथील इंदिरानगर बेघरवसाहत मधील युवकांचा चाकुने भाेसकुन खुन करण्यात आला प्रशांत भिकाजी भाेसले( वय 36)असे मयच युवकाचे नाव आहे या प्रकरणी संशयीत आराेपी अजित ऊर्फ पिंटु बाबु आदमाने (वय 40)याला शहापुर पाेलीसानी तब्यात घेतले आहे
सदरची घटना शुकवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असुन सदर घटनेची फिर्याद रंणजित भाेसले यानी शहापुर पाेलीस ठाणेत दिली
घटनास्थलावरुन व पाेलीसाकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की मयत प्रशांत भाेसले व संशयीत आराेपी अजित ऊर्फ पिंटु आदमाने हे एकमेकाचे मित्र होते गेली काही वर्षापासुन दाेघात अनैतिकसंबधातुन वाद निर्माण झाला हाेता त्यामुळे दाेघात एकमेकाबद्दल जुन्या वादातुन खुन्नस हाेती काल शुकवार रात्री साडेदहाच्या सुमारास मयत प्रशांत भाेसले याचा काटा काढण्याच्या हेतुने संशयीत आराेपी अजित ऊर्फ पिंटु आदमाने येथील पाण्याच्या टाकी जवळ उभा हाेता दरम्यान मयत प्रशांत भाेसले हा मित्रासाेबत बाहेर एक कार्यक्रम आटेपुन घरी जाण्यासाठी ताे ही येथील पाण्याच्या टाकीजवळ आला संशयीत आराेपी अजित ऊर्फ पिंटु आदमाने याने मयत प्रशांत भाेसले याला पाहताच मनातील राग उफाळुन आला व प्रशांत भाेसले याला छातीवर चाकुचा वर्मी घाव बसल्याने ताे गंभीर जखमी झाला या घटनेची महिती मिळताच त्याचे नातेवाईक व मित्रानी खाजगी दवाखान्यात घेवुन गेले पण उपचारापुर्वीच त्याचा मु्त्यु् झाला असल्याचे वैधकीय आधिकार्याने सांगितले त्यानंतर त्याचा मु्त्यदेह उत्तरीय तपासणीसाठी इचलकंरजी येथील इंदिरागांधी इस्पीतलात शवविच्छेदनासाठी आणण्यात अाला यावेळी रुग्णालयात नातेवाईक व मित्रानी माेठी गर्दी केली
सदर घटनेची महिती मिळताच पाेलीस उपअधिक्षक बी बी महामुनि व शहापुर पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक प्रसाद यादव व पाेलीस कर्मचारी व पाेलीस पाटील जगदीश सपकाळ यानी घटना स्थली धाव घेतली घटना स्थलाची पाहणी केली तसेच माेठा पाेलीस बंदोबस्त ठेवन्यात आला सकाळी शवविच्छेदन करुन म्रतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देन्यात आला.