अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी शिरूरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर कारवाई करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचविण्यातच वरिष्ठ प्रशासन वेळ घालवित आहे काय



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

शिरूर  : मोजणी करून निघालेल्या अतिक्रमांचा ताबा देण्यासाठी बनावट कागपत्रे तयार करून अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी शिरूरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर कारवाई करण्यासाठी फक्त कागदी घोडे नाचविण्यातच वरिष्ठ प्रशासन वेळ घालवित आहे काय ? अशी शंका यामधील तक्रारदारांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.मांडवगण फराटा येथील वाल्मिक महादेव फराटे, गंगुबाई महादेव फराटे यांच्या मालकीच्या गट नं.२५६/१, २५६/२ या क्षेत्राची अतिअतितातडीच्या सरकारी मोजणीमध्ये मोजणी करून हद्द कायम करणेकामी सर्व फौजफाटा घेऊन नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांनी केलेले काम संशयाच्या भोवऱ्यात आहे. तीन वेळा सरकारी मोजण्या करूनही ताबा मिळत नसल्यामुळे व केलेल्या मोजण्या तक्रारदारांना मान्य होत नसल्यामुळे आता तक्रारदारांनी आपली स्वतःची मोजणी करून ७/१२ प्रमाणे आमचे क्षेत्र काढून द्यावे, अशी मागणी वाल्मिक महादेव फराटे व गंगुबाई फराटे यांनी केली आहे. हद्द कायम करण्यासाठी आम्ही कायदेशीर प्रयत्न केला असून, यामध्ये कोणताही बेकादेशीर प्रकार केलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

तिसऱ्या मोजणीमध्ये अतिक्रमण कसे वाढले?

या मोजणी प्रकरणात भूमी अभिलेखकडून तीनवेळा मोजण्या केल्या असून २००८ मध्ये २२ गुंठे, २००९ च्या निमताना मोजणीमध्ये पुन्हा २२ गुंठे आणि २ मार्च २०२१ रोजी केलेल्या मोजणीमध्ये २७ गुंठे क्षेत्र अतिक्रमण असल्याचे समोर आले. तिसऱ्या मोजणीमध्ये अतिक्रमण कसे वाढले? यावर मोठा वाद निर्माण झाला आणि तक्रारदारांनी मोजणीवर शंका उपस्थित केल्यामुळे नायब तहसिदार यादव यांचा बनावट कागदपत्रांचा घोटाळा समोर आला. भूमी अभिलेखकडून तीन वेळा सरकारी मोजणी करून त्यातील एका मोजणीमध्ये ५ गुंठे क्षेत्र वाढले आणि संम्रभ निर्माण झाला.

सदोष मोजणी केली आहे काय?

मोजणीमधील तफावत, मोजणीसाठी वापरलेला फाळणी नकाशा आणि दाखवलेले अतिक्रमण यामधील फरक या कारणाने झालेली मोजणी वादग्रस्त ठरत असून भूमी अभिलेखने सदोष मोजणी केली आहे काय? ज्या यंत्रणेवर नागरिकांनाच विश्वास आहे, त्यावरील विश्वासाला या प्रकरणामुळे तडा जात आहे काय? मोजणी करूनही शेतकऱ्यांचे बांध व हद्दीवरून तालुकाभर वाद-विवाद व मारामाऱ्यांची प्रकरणे तालुक्यात वाढलेली आहेत. याला कारणीभूत असणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई होणे आवश्यक आहे. नायब तहसीलदार यादव यांनी केलेल्या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचा विश्वास ढळला असून, महसूल खाते, भूमी अभलेख आणि पोलिस यंत्रणेसह सर्वानी मिळून वहिवाटीस हरकत अतिक्रमणांचा ताबा देण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

सह्या करण्याचे मला अधिकार...

दरम्यान, तहसिलदार गैरहजर असताना त्यावेळी सह्या करण्याचे मला अधिकार आहेत. घडलेला विषय खूप मोठा नाही, अशी प्रतिक्रिया नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post