शिरोळ तालुका प्रतिनिधी : ओमकार पाखरे :
उदगाव ( ता: शिरोळ) : उदगावच्या उपसरपंचदी रमेश कुबेर मगदूम- वठारे यांची शुक्रवारी ग्रामपंचायत उपसरपंचदी निवड करण्यात आली.
उपसरपंच पदासाठी तीन अर्ज आले होते. त्यामध्ये रमेश कुबेर मगदूम - वठारे, सुनीता अदीनाथ चौगुले, दीपिका बंडेश कोळी हे होते. यामधील सौ. सुनीता अदीनाथ चौगुले यांनी माघार घेतला असता त्यामुळे रमेश कुबेर मगदूम - वठारे आणि दीपीका बंडेश कोळी यांच्यात थेट लढत सुरू राहिली.दीपीका बंडेश कोळी यांना आठ मते मिळाली. तर रमेश कुबेर मगदूम - वठारे यांना नऊ मते मिळाली. रमेश कुबेर मगदूम - वठारे हे एका मताच्या फरकाने विजयी झाले. रमेश कुबेर मगदूम - वठारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आसता संघटनेच्या महाविकास आघाडीच्या सत्तेला उदगावच्या उपसरपंच पदावर रुजू केले. विजयी झाल्यानंतर रमेश मगदुम- वठारे यांच्या समर्थकांनी आथिषबाजी करून, गुलाल उधळून सोशल डिस्टनसचे पालन करून आनंद साजरा केला.