प्रेस मीडिया वृत्तसेवा :
आज रायचूर जिल्ह्यातील सिंधनुरू तालुक्यातील जवळगेरे गावात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने निर्माण केलेल्या इ लर्निग व्यवस्था असणाऱ्या नवीन अंगणवाडी केंद्राला *राज्य महिला व बालविकास विभाग,अपंगत्व आणि ज्येष्ठ नागरिकांचे सशक्तिकरण विभागाच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले जी(वहिनी)* यांनी भेट देऊन, तेथील व्यवस्था पाहिले. ही बालस्नेही अंगणवाडी असून, खेळाद्वारे शिक्षण, सोलार पॅनलसह सर्व सुविधा उत्तम रीतीने केले आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यात 100 अंगणवाडी केंद्र निर्माण झाले आहेत. पोषण अभियानांतर्गत या अंगणवाडीत होणाऱ्या सर्व माहिती विभागाला उत्तमरीतीने आपडेट करत असून, अंगणवाडी कार्यकर्ते आणि कर्मचारी वर्गाचे कार्य कौतुकास्पद आहे असे सांगीतले.