रवींद्र देशमुख यांची महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहर सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : ऑनलाईन माध्यमांमध्ये मागील ८ वर्षापासून क्रीडा आणि पॉलिटीकल पत्रकारिता करत असलेले रवींद्र देशमुख यांची महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहर सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्याकडून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील डिजिटल मीडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मीडियातील सर्व प्लॅटफॉर्म्सवर संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेले सर्वच पत्रकारबांधव ऑनलाईन माध्यमांना लोकमान्यता मिळण्यासाठी धडपडत असतात.त्यामुळे, मुंबई, पुण्याससह राज्यातील सर्वच विभागातील संपादक-पत्रकारांच्या साथीने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राजा माने यांनी स्थापना केली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन माध्यमांनी गेल्या काही वर्षात उतुंग भरारी घेतली आहे. परंतु, देशासह महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियाच्या विश्वासार्हतेवर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. या संदर्भात नवे नियम व कायदे अंमलात यावेत. तसेच डिजिटल मीडिया क्षेत्रात शिस्त यावी आणि या क्षेत्रातील प्रत्येकाला शासकीय पातळीवर अधिकृत मान्यता, संरक्षण आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, ऑनलाईन माध्यमातील संघटीत व असंघटीत पत्रकारांनी एकत्र येवून न्याय हक्कासाठी लढा द्यावा हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post