पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. दोन्ही भावांवर ७० वर्षीय महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारावर फसवल्याचा आरोप


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. करण्यात आला आहे. परांजपे बिल्डर्स च्या माध्यमातून पुणे-मुंबई आणि नजिकच्या परिसरात अनेक प्रकल्प प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात परांजपे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

७० वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री परांजपे यांना चौकशीसाठी पुण्यावरुन ताब्यात घेत मुंबईला आणलं आहे. श्रीकांत आणि शशांक परांजपे यांच्यासोबतच आर. पाटील नावाच्या एका व्यक्तीवरही पोलिसांनी IPC च्या ४०६, ४२०, ४६४, ४६७, ४६८ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी दिली.जानेवारी २०२० मध्ये परांजपे बिल्डर्सविरोधात अशाच पद्धतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातही पोलीस शशांक आणि श्रीकांत परांजपे या बंधूंची चौकशी करत आहेत. दोन्ही भावांवर ७० वर्षीय महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारावर फसवल्याचा आरोप आहे.

Post a Comment

Previous Post Next Post