प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : शहरातील खडकी दारूगोळा फॅक्टरीमधील (अतिस्फोटक निर्माणी) 70 हजार रूपये किंमतीची आठ चंदनाची झाडे चोरून नेण्यात आली आहे. याप्रकरणी सुरक्षा विभागाचे प्रमुख केशव पतंगे (वय 59, रा. कसबा पेठ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जूनच्या सायंकाळी सहा ते 20 जूनच्या सकाळी सहा दरम्यान घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंगे हे खडकीतील अतिस्फोटक निर्माणीमध्ये सुरक्षाविभागाचे प्रमुख आहेत. अतिस्फोटक निर्माणीच्या मॅगझीन परिसरामध्ये मोकळे मैदान आहे. संबंधित मोकळ्या मैदानात चंदनाची झाडे आहेत. 20 जूनला सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान चोरट्यांनी आठ चंदनाची झाडे तोडून त्यामधील अर्धाफूटाचा गाभा असा 70 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.