प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुण्यात आज दिवसभरात 258 नव्या कोरोनाबाधितांची तर 246 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे पालिका हद्दीत 17 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 560 इतकी झाली आहे. शहरात 314 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2522 झाली आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 77 हजार 084 इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 66 हजार 002 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 795 नमुने घेण्यात आले आहेत.तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Tags
Latest