पुणे : टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून देण्यात आलेली स्थगिती हटविणेबाबत अपना वतन संघटनेच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दि. २४/०६/२०२१ रोजी इमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले .
निवेदना मध्ये त्यांनी सांगितले आहे कि, देशासह , महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी टाटा रुग्णालयात येत असतात . त्यामधील अनेकजण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात . अनेक नागरिकांना उपचारकरिता मोठा कालावधी लागतो. त्या दरम्यान त्यांच्या सोबत आलेले नातेवाईकांना *निवासाची सोय नसल्याने इतरत्र भटकावे लागते वेळप्रसंगी फुटपाथवर ,रस्त्यावर रात्र काढावी लागते . थंडी व पावसामध्ये या सर्वांची प्रचंड तारंबळ उडते .या कालावधीत त्यांना आर्थिक भूर्दंड बसतो. याची दखल घेऊन व रुग्णांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार माणुसकीच्या दृष्टिकोनातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना खूप मोठा आधार मिळाला होता.तसेच या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुकही करण्यात आले होते.
पण तेथील स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या आरोग्यांचा प्रश्न निर्माण होतो व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न विचारता हा निर्णय घेण्यात आल्याचे कारण देत या निर्णयाला विरोध केला होता व तशी तक्रार मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. परंतु कॅन्सर बाबत राज्य व केंद्र सरकार जाहिरातीच्या माध्यमातून व विविध उपाययोजना द्वारे जनजागृती व प्रबोधन करीत असताना काही लोकप्रतिनिधी त्याउलट कृती करीत आहेत .
वास्तव पाहता त्या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात येणार नसून त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था सदर सदनिकांमधून केली जाणार होती. आरोग्याचा धोका निर्माण होतो अशा प्रकारच्या अफवा पसरवून कॅन्सर ग्रस्त रुग्णविषयी तिरस्कार करण्याचा व त्याद्वारे रुग्णांचे मनोबल कमी करण्याचा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधी करीत आहेत. अशा रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक असताना संपूर्ण माहिती न घेता केवळ स्थनिक आमदारांच्या आग्रहाखातर त्या पिडीताच्या कुटुंबियांना निवाऱ्यापासून वंचित ठेवणे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचा अपना वतन संघटनेच्या वतीने निषेध करीत आहोत. व संपूर्ण प्रकरणाचा पुनर्विचार करून टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या निर्णय पूर्ववत लागू करावा अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
आपण राज्याचे प्रमुख असून कॅन्सर ग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसोबत परकेपणा करू नये व सदर निर्णयाची तात्काळ अंबलबजावणी करण्याचे प्रशासनाला आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.