पुणे – महाराष्ट्र राज्य मागासर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केली.
याबाबतची अधिसूचना राज्य शासनाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी दि. 15 जून रोजी काढली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या आयोगाची मुदत संपली होती. त्यानंतर राज्य सरकारने राज्य मागासगर्वीय आयोगाचे पुनर्गठण केले आहे. राज्य मागासगर्वीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात एकूण 9 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात प्रा. संजीव सोनवणे, प्राचार्य बबनराव तायवडे, ऍड. चंद्रलाल मेश्राम (माजी न्यायमूर्ती), ऍड. बालाची किल्लारीकर, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलीमा सराप (लखाडे), डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके, ज्योतीराम चव्हाण यांचा समावेश आहे. पुणे विभागातून डॉ. सोनवणे आणि प्रा. हाके यांची निवड करण्यात आली आहे