प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : शंभूराजे अनाथ आश्रमात वृक्षारोपण, अन्नदान या विधायक कार्याने लोकशाहीर गफुरभाई पुणेकर यांचा ३रा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
गेल्या ४० वर्षाहून अधिक काळ नाटक, चित्रपट, तमाशा, लोककला या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि कलावंतांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या लोककलावंत शाहीर गफुरभाई पुणेकर यांचा ३ रा स्मृतिदिन शाहीर गफुरभाई पुणेकर सोशल फौंडेशन, हडपसर कलाकार महासंघ,परिवर्तन कला महासंघ यांच्या वतीने धर्मवीर शंभुराजे अनाथालय मधे विधायक कामांनी पुण्यातील कलाकारांनी साजरा केला*,.
*धर्मवीर शंभुराजे अनाथालय येथे शाहीर गफुरभाई पुणेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना नगरसेवक मारुती आबा तुपे, जेष्ठ लोककलावंत जयप्रकाश वाघमारे, लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय आल्हाट, जेष्ठ समाजसेवक अनिल हातागळे, शाहीर गफुरभाई पुणेकर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष अमर पुणेकर व पुणेकर कुटुंबांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले,.गफुरभाई यांच्या स्मृती समाजात तेवत ठेवण्यासाठी झाडे लावा झाडे जपा या उक्तीआधारे "एक झाड आठवणीतले"..म्हणुन फळझाडे लावुन वृक्षारोपण करण्यात आले.., याप्रसंगी अभिवादनपर बोलताना " सारे आयुष्य गफुरभाईंनी कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न तडीस नेण्याचे काम केले, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी समाजात रुजायला हव्या व लोककलेचे प्रशिक्षण, जतन संवर्धन व्हावे तसेच नवीन कलावंत घडून सांस्कृतिक वैभवात भर पडावी याकरिता लोकशाहीर गफूरभाई पुणेकर लोककला अकादमी स्मारक पुणे महापालिकेने उभे करावे,"असे लोक जन शक्ती पार्टीचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पुणे मनपा ला आवाहन केले*.
*या विधानाला उत्तर देताना नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी पुर्णपणे आम्ही कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,.अन पालिकेमध्ये स्मारकासाठी लवकरच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले कलाक्षेत्रातील गफूरभाईचे योगदान महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही पण कर्मभूमी असलेल्या पुणे मनपा ला मात्र या शाहीराचा विसर पडला आहे. पट्ठे बापूराव प्रतिष्ठानचे जयप्रकाश वाघमारे, अनिल हातागळे यांनी गफुरभाईंच्या शब्दशः स्मृती जागवल्या. यावेळी *उजाले उनकी यादोंकी* हा मनोरंजनपर वाद्यवृंदसह *संगीतमय कार्यक्रम* पुण्यातील *अजय क्षीरसागर, विनायक पवार, सुंदर पाटोळे, कल्पना जगताप, विनोद धिवार, यांनी आश्रमातील मुलांसाठी सादर केला,.कार्यक्रमाचा समारोप मुलांना अन्नदान करुन करण्यात आला*,. आलेल्या सर्व मान्यवर व* *कलाकारांचे शब्दसुमनाने आभार मानले गेले. कार्यकमासाठी जगदीश चव्हाण, श्रीकृष्ण भिंगारे, अण्णा गावडे, राजेंद्र कुलकर्णी, राजु कडेकर, विकल्प ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले*.
*कार्यक्रमाचे आयोजन अमर पुणेकर व प्रशांत बोगम यांनी केले*