प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल आणि नितीन राठोड, किसान पुत्र आंदोलन माहिती तंत्रज्ञान संयोजक असलम सय्यद यांनी आज १७ जून २०२१ रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. किसानपुत्र आंदोलनाचे अनंतराव देशपांडे आणि राजीव बसर्गेकर हेही या भेटीत सहभागी झाले होते.
शिष्टमंडळाने शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांना असलेले घटनेच्या ३१ बी कलमाचे आणि अनुच्छेद ९ चे संरक्षण याची माहिती खासदार गिरीश बापट यांना दिली. ही घटना दुरुस्ती १८ जून १९५१ रोजी, मूळ घटना राष्ट्राला अर्पित झाल्यानंतर, आणि निर्वाचित संसद स्थापित व्हायच्या आधी कशी केली गेली याचा संक्षिप्त इतिहास सांगितला. सध्या अनुच्छेद ९ मध्ये २८४ कायदे असून त्यातील २५० शेतीशी निगडीत असल्याची माहिती दिली.
या कायद्याचा पुनर्विचार संसदेत अर्ज करून देता येतो अशी शक्यता ही सांगितली. खासदार गिरीश बापट यांनी त्याला दुजोरा दिला आणि सांगितले की असे हजाराहून जास्त काय कालबाह्य कायदे संसदेने रद्द केले आहेत.
शिष्टमंडळाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्या संबंधी अर्ज करावा आणि पुढाकार घ्यावा अशी खासदार गिरीश बापट यांना विनंती केली. त्याच बरोबर यासाठी अजूनही काही माहिती हवी असेल ती पुरवण्यासाठी सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार गिरीश बापट यांनी शिष्टमंडळातील सर्वांची नावे आणि फोन नंबर नोंद करून घेतले, आणि संपर्क करून सविस्तर बैठक घेण्याची आणि बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गिरीष बापट साहेब यांना संसदेत सादर करण्यासाठी खाजगी विधायक तयार करुन दिले जाईल. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी अनन्य कुठले मार्ग वापरता येऊ शकतात याबाबत पुन्हा भेटीत चर्चा करण्यात येणार आहे.
खासदार गिरीश बापट यांनी अमर हबीब यांच्याबरोबर असलेला अनेक वर्षांचा परिचय आणि त्यांच्या भेटीगाठी यांचा आवर्जून उल्लेख केला. निवेदना बरोबरच यावेळी खासदार गिरीश बापट यांना शेतकरी विरोधी कायदे ही पुस्तिका सुद्धा देण्यात आली.
बापट साहेब म्हणाले देशात अनेक समस्या आहेत. एक खासदार सर्व गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. समाजातील नागरिक हे जर प्रश्न घेऊन आले तर किमान त्यावर चर्चा करुन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतात.
मयुर बाळकृष्ण बागुल,
समनव्य समिती सदस्य - किसानपुत्र आंदोलन, पुणे
मो - 9096210669