प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे :एज्युकेशन कंटिन्यूटी प्लॅन'विषयावरील ऑनलाईन चर्चासत्राला गुरुवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ने 'बडा बिझनेस' या व्यासपीठाच्या सहकार्याने हे चर्चासत्र आयोजित केले होते. 'बडा बिझनेस' चे संस्थापक डॉ विवेक बिंद्रा,अभिनेते विवेक ओबेरॉय,संजय कथुरिया यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या चर्चासत्रांत सहभागी झाल्याची माहिती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी दिली.शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील संधींविषयी या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले. ५ हजार संस्था सहभागी झाल्या.
अभिनेते विवेक ओबेरॉय म्हणाले,'भारत हा गुणवत्तेने भरलेला देश आहे.भारतीय विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे,मात्र ,त्यांना योग्य शिक्षण आणि उद्योजकीय कौशल्ये देण्याची गरज आहे.शिक्षणातून परिवर्तन घडू शकते.शिक्षण हे गुणवत्तापूर्ण होण्याची गरज असून शिक्षणाचे लोकशाहीकरण होणेही आवश्यक आहे.'बडा बिझनेस ' या व्यासपीठाच्या साहाय्याने ही प्रक्रिया गतिमान होईल.'
डॉ विवेक बिंद्रा म्हणाले,'कोरोना नंतरच्या काळात अर्थव्यवस्था बदलत असून शिक्षण प्रणालीही बदलत आहे.या शिक्षणप्रणालीतून बेरोजगार बाहेर न पडता विविध कौशल्ये असणारा विद्यार्थी बाहेर पडणे आवश्यक आहे. 'बडा बिझनेस ' हे व्यासपीठ एकाचवेळेस विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांना पुढे जाण्यास मदत करीत आहे.