शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या पोलिसांच्या बदली प्रक्रिया सॉफ्टवेअरचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे - शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या पोलिसांच्या बदली प्रक्रिया सॉफ्टवेअरचे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या सॉफ्टवेअरच्या कार्यपद्धती विषयी माहिती घेत, प्रणालीचे कौतुक केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनासारखी आणि पारदर्शकपणे बदली मिळण्यास मदत होणार आहे.या प्रणालीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पद, कार्यकाळ इत्यादी बाबीची नोंद असणार आहे. ही प्रणाली तयार करण्यासाठी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे व स्वप्ना गोरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त गोरे यांनी सादरीकरण करून कार्यपद्धतीची माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post