घर पोच खाद्यपदार्थ पोहोचवणारेच निघाले अट्टल चोर , हडपसर पोलिसांनी अटक केली.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे - सोसायट्यांतील ज्येष्ठ महिलांवर पाळत ठेवून त्यांचे दागिने हिसकावणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. एका ऍपद्वारे ऑनलाइन ऑर्डर आल्यानंतर हे चोरटे घर पोच खाद्यपदार्थ पोहचवतात. त्यांनी हडपसर, चंदननगर भागांत दागिने हिसकावल्याचे तपासात समोर आले आहे.या प्रकरणी आकाश जाधव (23, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर, मूळ सोलापूर), विजय पोसा (22, रा. तुळजाभवानीनगर, खराडी), साहिल गायकवाड (वय 19, रा. सावरखेड, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली.

हडपसरच्या निर्मल टाऊनशिप सोसायटी आवारातील एका वृद्धेचे दागिने आठवड्यापूर्वी चोरट्यांनी हिसकावले होते.पोलिसांनी सोसायटी आवारातील सीसीटीव्ही तपासले होते. यात संबंधित चोरट्याकडे खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपनीची पिशवी असल्याचे चित्रिकरणात दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी हडपसर भागात ठिकठिकाणी सीसीटीव्ही चित्रिकरण तपासत चोरट्यांचा शोध सुरू केला.

तेव्हा चोरटे चंदननगर, खराडीपर्यंत गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जाधव, पोसा, गायकवाड यांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सौरभ माने यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post