प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे – डोळ्याचे क्लिनिक व मोतीबिंदु सेंटर फोडून 2 लाख 35 हजाराची चोरी करण्यात आली. ही घटना माणिकबाग येथील कुदळे पाटील प्रस्टीज मध्ये घडली. याप्रकरणी डॉ.दिपक पाठक (42,रा.नांदेडसिटी) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ.पाठक यांनी 15 जून रोजी नेहमी प्रमाणे क्लिनिक बंद केले होते. ते 16 तारखेला क्लिनिक उघडायला आले असता, त्यांना क्लिनिकच्या दरवाजाचा कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी क्लिनिकमधील ड्रॉवर तपासला असता, त्यातील रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे करत आहेत.
90 हजाराचे मंगळसूत्र हिसकावले
हडपसर येते पायी जात असलेल्या महिलेचे 90 हजाराचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. ही घटना हडपसर येथील काळेपडळ येथे बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करत आहेत.