सुपा येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना काळात उत्तम काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पारनेर :
संघर्ष करणारा नेता, आक्रमकता असलेला नेता, लोकप्रियतेचा राजा, सौंदर्यदृष्टीच सखोल ज्ञान असलेला नेता, जगविख्यात व्यंगचित्रकार, प्रचंड बुद्धीमत्ता, राजकारणाचा अप्रतिम ठोकताळा, कधीही न खचणारा नेता, वादळात देखील खंबीरपणे उभा राहणारा, भारदस्त आवाज, मराठीचे प्रगल्भ ज्ञान, मराठी अस्मिता रक्षक, महाराष्ट्राचे भाग्यविधाते,
आज सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्मिन सेना पारनेर तालुक्याच्या वतीने सुपा गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच/उपसरपंच,ग्रामसेवक सुपा ग्रामपंचायत च्या वतीने कोव्हीड विलगीकरण सेंटर चालु करुन जवळ पास 300 रुग्णांची सेवा केली त्यामुळे त्याचा सर्व स्टाप चा सन्मान करण्यात आला व पञकार सर्व सन्माननीय श्री.शरद रसाळ सर पञकार मिञ श्री सुरेद्रं शिंदे सर,पञकार मिञ दत्ता घाडगे सर डाॅक्टर अजय येणारे कोरोणा काळात आपला जिव धोक्यात घालून सर्व अपडेट देतच होते त्यामुळे त्यांचा कोव्हीड योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला तसेच सुपा पोस्ट आॅफीसचे पण सर्व कर्मचारी बांधवांना पण सन्मान करण्यात आला सुपा आयुष्य मान भारत आरोग्य केंद्राच्या सर्व स्टापचे मनापासून आभार व कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा पण सन्मान करण्यात आला तसेच सॅनिटायझर फवारणी केली गटांमध्ये , वाघुंडे/ येथे सॅनिटायझर फवारणी केली तसेच पळवे येथे आयुष्य मान भारत आरोग्य केंद्राच्या सर्व स्टापचे मनापासून आभार व कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचा पण सन्मान करण्यात आला तसेच पळवे सरपंच / उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यांचा पन सन्मान करण्यात आला आज पळवे येथे एकही रुग्ण नसल्याचे सरपंच कळमकर ताई यांनी सांगितले व तेथील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी परिसर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली तसेच सुपा पोलिस स्टेशन चे पण सॅनिटायझर फवारणी करण्यात आली अशा प्रकारे राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.