नवी दिल्ली - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला येत्या 26 जून रोजी सात महिने पुर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्या दिवशी सर्व देशभरातील राजभवनावर धरणे धरण्याचा कार्यक्रम आंदोलक शेतकऱ्यांनी घोषित केला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने आज ही घोषणा करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवून ही निदर्शने करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही तसे निवेदन सादर केले जाणार आहे.केंद्र सरकारने नव्याने जारी केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी ही निदर्शने असणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे नेते इंदरजीतसिंग यांनी आज पत्रकारांना सांगितले की, 26 जून हा दिवस आम्ही खेती बचाव संविधान बचाव दिन म्हणूनही साजरा करणार आहोत.