प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई - भारतीय कुस्तीला मोठा इतिहास आहे. त्यातील बारकावे पैलवान शंकरराव पुजारी यांनी आयुष्यभर जपले. समलोचनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहचवली. आज पुस्तकाच्या स्वरूपात संकलन करून एक ऐतिहासिक ऐवज तयार झाला आहे. हे फार मोठे काम आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ज्येष्ठ कुस्ती समलोचाक पैलवान शंकरराव पुजारी यांच्या भारतीय कुस्ती - इतिहास आणि परंपरा या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. श्री. पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी लेखक पैलवान शंकरराव पुजारी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, तेजस प्रकाशन चे प्रमुख रावसाहेब पुजारी, शिरोळच्या पसायदान चे संचालक संजीव पुजारी, रविकिरण ढवळे आदी उपस्थित होते.