धनंजय हलकर (शिंदे)
मिरज : मिरज शहर शिवसेनेचा वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पतंगाच्या दोरा (मांझा) यांची विक्री संदर्भात निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली.
सध्या मिरज शहरात पतंग उडवण्याचा खेळ जोरात सुरू असुन सदर खेळात दोरा(मांझा)हा नायलॉन दोरा तसेच.काच लावलेल्या दोरा वापरुन सदर दोऱ्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत तसेच प्राणी पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होत असून यावर उपाय म्हणून मिरज शहरातील मांजा पतंग विक्रीसाठी व वासरासाठी बंदी विक्री करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावे ही नम्र विनंती निवेदन देताना शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजीराव सातपुते, मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे मिरज शहर प्रमुख विजयराव शिंदे मिरज शहर संघटक किरण सिंग राजपूत माजी उपशहर प्रमुख गजानन मोरे तालुका संघटक रमेश नाईक संदीप पाटील सुनील कांबळे (पेंटर) प्रकाश जाधव दिलीप नाईक रोहित चौगुले. संदीप दिंडे तमाम शिवसैनिक उपस्थित होते.