प्रेस मीडिया वृत्तसेवा :
म्हैसाळ- : शुक्रवारी म्हैसाळ तालुका मिरज येथील शार्दूल फार्मार्सुटीकल्स इंडस्ट्रियल को. ऑप सोसायटी लि. म्हैसाळ या संस्थेच्या आयुर्वेदिक औषधे उत्पादन करीत असलेल्या युनिटला आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली, यावेळी त्यांचे अमृतहस्ते NEO BOOST या रोगप्रतिकारक सिरप चे लॉंचिंग करणेचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी ते बोलत होते, आयुर्वेदिक औषध निर्माण करणारी संस्था सहकारी तत्त्वावर सुरू केली असल्याबद्दल सर्वप्रथम त्यांनी विश्वस्तांचे कौतुक केले,
कोरोना विषाणू वर आजमितीला तरी रोगमुक्त करणारे असे कोणतेही औषध उपलब्ध नाही, तरी परंतु ॲलोपॅथी मध्ये भारतीय संशोधक आणि डॉक्टरांनी निर्माण केलेल्या लसीमुळे कोरोना चा संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश येत आहे, त्यामुळे अलोपॅथी चे महत्व आणि योगदान मोठे आहे ऍलोपॅथी बरोबरच आयुर्वेदिक क्षेत्रात सुद्धा संशोधन होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती भविष्यात व्हायला हवी अशी अपेक्षा यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केली, आणि संस्थेच्या या नवीन उत्पादनास शुभेच्छा दिल्या यावेळी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,मनोजबाबा शिंदे-म्हैसाळकर, शार्दुल फार्मास्युटिकलचे चेअरमन केरबा गोरोबा वडवराव, संचालक विनायक खोंद्रे, प्रशांत सत्यवान संकपाळ विठ्ठल चोपडे, मुजाहिद्दीन कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्तीत होते.