प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शालेय शिक्षण विभागाने बारावी परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख राज्य शिक्षण मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यालाच राज्य सरकारचे प्राधान्य असून बारावी परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी राज्य सरकारने केली होती.
Tags
Latest