पेठवडगावात आमदार राजूबाबा आवळे यांनी मोफत जेवण व मोफत कोविड केअर सेंटरला भेट





 पेठवडगाव :  आमदार राजूबाबा आवळे यांनी मोफत जेवण व मोफत कोविड केअर सेंटरला भेटविजयसिंह यादव प्रतिष्ठानच्यावतीने* राबविण्यात येत असलेल्या मोफत जेवण उपक्रमास भेट दिली. लॉकडाऊन काळात येथून हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी अभिजित गायकवाड, बाजार समितीचे संचालक रणजितसिंह यादव, कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण,राहूल माने आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

      यासोबतच दहा तरूणांनी सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या *छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरला भेट देऊन रूग्णसेवेचा आढावा घेतला.* तरुणांनी सुरू केलेल्या या सेंटरचा अनेक रुग्णांना फायदा होत आहे.यावेळी भूषण विभूते,विजयसिंह शिंदे,

राज कोळी,नितीन कुचेकर, महेश भोपळे,राज कोळी,विजय माने,संजय कोठावळे,पियुष सावर्डेकर,पवन पोवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच  हेंद्रे हाॅस्पीटलमध्ये  *स्व. शिवाजीराव सालपे   फौंडेशनने  मोफत कोविड केंद्र सुरू केले आहे.* येथील रूग्ण सेवेचा फायदा कोरोनाबाधित रूग्णाला होत आहे. यावेळी युवा नेते व फौंडेशनचे अध्यक्ष अभिनंदन सालपे,उपाध्यक्ष राजवर्धन पाटील- बावडेकर,धैर्यशील सालपे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post