तोतापुरी आंबे भरून घेऊन निघालेल्या ट्रकला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात , अपघातात चालक गंभीर जखमी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

तोतापुरी आंबे भरून घेऊन निघालेल्या ट्रकला पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक कराडमधील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपुलाजवळ उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालकासह एकाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी स्थानिकांनी रस्त्यावर पडलेले आंबे पळवले आहेत.

कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने सोमवारी पहाटे तोतापुरी आंबे घेऊन ट्रक निघाला होता. ट्रक कराड येथील कोल्हापूर नाका येथे आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रक सुरक्षा रेलिंग तोडून पूलाच्या कठड्याला धडकून उलटला.या अपघातानंतर महामार्गाच्या कडेला सर्वत्र आंबे पसरले होते. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी रस्त्याकडेला पडलेले आंबे पळवले. अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, अमित पवार, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, दोन होमगार्ड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत ट्रकमधील चालकासह एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत

Post a Comment

Previous Post Next Post