प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : जिल्हा परिषदेने २०२०-२१ साठी कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी (वर्ग ३) मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून) इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारासाठी निवड केली. पुरस्कारातून परिचर वगळले असल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कर्मचाऱ्यांची निवड करतांना त्यांचे गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे, समयसूचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णयशक्ती, नियमांचे ज्ञान, सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी व प्रामाणिकपणा आदी निकषांद्वारे १६ कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.आज स्थायी समिती सभेत अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, सौ.पद्माराणी पाटील, स्वाती सासणे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्कारप्राप्त कर्मचारी
सुमन सुभेदार (विस्तार अधिकारी शिक्षण, चंदगड), नारायण चांदेकर (अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग), प्रशांत पाटील (वरिष्ठ सहायक डीआरडीए), नंदकुमार पार्टे (कनिष्ठ सहायक, राधानगरी), आनंदा चव्हाण, सुभाष लांबोरे (वाहन चालक), संभाजी हंकारे व शांताराम पाटील (सहायक लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाअधिकारी (विभागून), शांताराम शामराव पाटील (आरोग्य विभाग), संतोष पाटील (सहाय्यक अभियंता, राधानगरी), शिवाजी कोळी (विस्तार अधिकारी, शिरोळ), विनायक पाटील (पशुधन पर्यवेक्षक, गडहिंग्लज), प्रवीण मुळीक (आरोग्य सेवक, उपकेंद्र निगवे), अमोल कोळी (आरोग्य सहायक, टाकळी), अनघा पाटील, (आरोग्य सेवक उपकेंद्र पाडळी बुद्रुक), बेबीताई घोलप आरोग्य सहायक ( प्रा.आ.केंद्र, करंजफेण), रामचंद्र गिरी (औषध निर्माण अधिकारी प्रा.आ. केंद्र, मिणचे खुर्द).