कवठेसार येथे गोकुळच्या बल्क मिल्क कुलरचे उदघाटन
प्रेस मीडिया वृत्तसेवा : कवठेसार-
गोकुळने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ या संघाची प्रतिमा देशभरातील दूध संघांच्या तुलनेत मोठी आहे, जुन्या नव्या सहकारी विश्वस्तांना सोबत घेऊन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील आबाजी सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हिताचे चांगले निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे, दूध हा नाशवंत पदार्थ आहे त्यामुळे त्याची गुणवत्ता टिकवणे हे गावागावांतील दूध संस्थांबरोबरच दूध संघासाठी मोठे आवहान असते, नवनवीन तंत्रज्ञान या व्यवसायात येत आहे, गोकुळने सर्वांच्या पुढे राहून नवीन तंत्रज्ञान जिल्हाभर सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे, गोकुळच्या दुधाची प्रत सर्वोत्कृष्ट असल्यामुळेच मुंबईसह राज्यभरात गोकुळ दूध आणि त्यांच्या इतर उत्पादनांचा फार मोठा ग्राहकवर्ग आहे असेही राज्यमंत्री यड्रावकर यावेळी म्हणाले, गोकुळच्या एकूण कार्यपद्धती मध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे तो आम्ही सर्वांना बरोबर घेऊन करू आणि गोकुळला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी संघटित प्रयत्न करू असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले,
कवठेसार तालुका शिरोळ येथे गोकुळ च्या वतीने उभारण्यात आलेल्या बल्क मिल्क कुलर चे उदघाटन सोमवारी झाले यावेळी ते बोलत होते, गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील आबाजी प्रमुख उपस्थित होते,
या परिसरात गोकुळ च्या वतीने उभारलेल्या या बल्क मिल्क कुलर मुळे दुधाचा दर्जा उत्तम राखण्यात व त्याचे वजन व गुणवत्ता टिकवण्यात मोठी मदत होणार असल्याचे चेअरमन विश्वास पाटील आबाजी यांनी यावेळी सांगितले, गोकुळचे नवनिर्वाचित संचालक माजी आमदार सुजित मिणचेकर, अजित नरके, करणसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगुले, शशिकांत चुयेकर, डेंगे पाटील, श्रीमती रेडेकर वहिनी, गोकुळचे कार्यकारी संचालक श्री घाणेकर
पोपट भोकरे, माजी सरपंच बशीर फकीर, आनंद एम दूध संस्थेचे प्रमुख सुशांत पाटील, प्रकाश मलगोंडा पाटील, सुभाष पाटील, बाळासो कुरणे, सुभाष माने, रमेश मगदूम, देवाप्पा मगदूम, जय हनुमान तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, दूध संस्था व सेवा सोसायटी यांचे सर्व सन्माननीय संचालक व दूध उत्पादक उपस्थित होते.