कवठेगुलंद तालुका शिरोळ च्या सामान्य शेतकऱ्यांना शिवसेना खासदार धैर्यशील दादा यांच्याकडून मिळाला न्याय.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कवठेगुलंद तालुका शिरोळ च्या सामान्य शेतकऱ्यांना शिवसेना खासदार धैर्यशील दादा यांच्याकडून मिळाला न्याय. कवठेगुलंद शेतकरी मा. प्रकाश सदाशिव जगताप यांनी काही वर्षापूर्वी शिरोळ सब डिव्हिजन मध्ये नवीन शेती पंप कनेक्शन साठी अर्ज केला होता. वारंवार हेलपाटे मारुन व पाठपुरावा करूनही कारणे सांगून संबंधित अधिकारी टाळाटाळ करत होते.  ही बाब सचिन जगताप रा. कवठेगुलंद यांनी त्यांचे सहकारी मित्र हातकणंगले शिवसेना नगरसेवक रणजीत पाटील यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशील दादा यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

खासदारसाहेबांनी तातडीने  संबंधित अधिकाऱ्यांना जगताप व नवीन शेतकऱ्यांना ताबडतोब नवीन शेती पंप कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याचा संदर्भ घेत महावितरणने नवीन दोन पोल व तारा ओढून जगताप व इतर शेतकऱ्यांना शेती पंप कनेक्शन जोडून दिले आहे.  शिरोळ परिसरामध्ये धैर्यशील दांदा नी सामान्य शेतकर्‍यांना न्याय दिला याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

* सामान्य शेतकऱ्यांना तातडीने न्याय दिल्याबद्दल *खासदार धैर्यशील दादा माने व  नगरसेवक रणजीत पाटील यांचे खूप धन्यवाद तसेच महावितरणचे डेप्युटी Executive इंजिनियर शिरोळ माने साहेब, कवठेगुलंद चे ज्युनियर इंजिनियर पांढरे साहेब ईतर कर्मचाऱ्याचे सुद्धा आभार.*🙏

Post a Comment

Previous Post Next Post