मेहंदीसाहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..*



 प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

गझल गायकीतला  'शहंशाह ए गझल ' म्हणून ओळखले जाणारे ख्यातनाम गझल गायक ' मेहंदी हसन 'यांचा आज नववा स्मृतिदिन. १८ जुलै १९२७ रोजी राजस्थानात त्यांचा जन्म झाला. आणि १३ जून २०१२ रोजी कराची येथे ते कालवश झाले, मेहंदी हसन हे गझल गायकीतले फार मोठं नाव आहे. त्यांच्या घराण्याच्या सलग सोळा पिढ्या गझल गायकीत योगदान देत आल्या आहेत. मेहंदी हसन यांनी आपल्या आवाजातून अनेक गझला अजरामर केल्या. उर्दू शायरीतील फार मोठं नाव असलेल्या अहमद फराज यांची ' रंजिश ही सही....' ही गझल मेहंदी हसन यांच्या आवाजात ऐकतांना एक वेगळीच अनुभूती येते. गझल गायकी ही शब्दप्रधान गायकी आहे. गझलकाराचे शब्द नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोहोचविणे हे गझल गायकाच्या प्रतिभेवर अवलंबून असते.उर्दू गझलेतील ' रंजिश ही सही....' ही गझल मला नेहमीच त्याबाबत फार भावलेली आहे. त्या गझलचे काही शेर मी अहमद फराज यांच्यावरील लेखात माझ्या  'गझलानंद 'या पुस्तकातही दिले आहेत.मेहंदीसाहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..*

Post a Comment

Previous Post Next Post