शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने कोविड* प्रतिबंधक लसीकरण : नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ अलका स्वामी



प्रेस मीडिया वृत्तसेवा  : इचलकरंजी

परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांना पुणे व मुंबईच्या धर्तीवर प्राधान्याने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवारी नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ अलका स्वामी यांची भेट घेतली. त्याची दखल घेत *नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी संबधित विद्यार्थ्यांना प्राधान्याने *कोविड प्रतिबंधक लस देण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्याधिकारी यांना दिल्या.

शहरातील अनेक विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी विविध* *देशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत आसतात. परदेशात साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शैक्षणिक सत्र सुरु होते. कोविड संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर परदेशात शिक्षणासाठी जाणार्‍या* *विद्यार्थी-विद्यार्थीनींना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य आहेत. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच विमान प्रवास तसेच परदेशात राहण्यासाठी परवानगी दिली जात आहे. सध्या केवळ 45 वर्षावरील व्यक्तींनाच लस दिली* *जात असल्याने  परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांना लस मिळत नाही. सध्या पुणे व मुंबई येथे परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची आवश्यक ती कागदपत्रे पाहून लस दिली जात आहे. त्याच* *धर्तीवर इचलकरंजीतसुध्दा शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांची कागदपत्रे तपासून प्राधान्याने लस देण्यात यावी. लस न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यासह शैक्षणिक कर्जामुळे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सोसावा लागणार आहे. भविष्याचा विचार करुन* *प्राधान्याने लस द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.*

*त्या अनुषंगाने शहरातून परदेशात शिक्षणासाठी जाण्यार्‍या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पाहुन त्यांना प्राधान्याने कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे अशा सुचना मुख्यधिकारी यांना नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी* *दिल्या आहेत. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाण्यार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सौ. स्वामी यांनी सांगितले.*

Post a Comment

Previous Post Next Post