शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील माऊली कोविड सेंटरला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली.

 



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

आज शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील माऊली कोविड सेंटरला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा. नामदार  राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. सेंटरची पाहणी करून उपस्थित डॉक्टर्स परिचारिका व सपोर्टेड स्टाफ यांच्याशी कोरोना बाधित रुग्णांना बाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले, माऊली कोव्हिड सेंटर मधून कोरोना बाधित रुग्णांना विनामूल्य सेवा मिळत असल्याबद्दल संयोजकांचे त्यांनी कौतुक केले, सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी ही त्यांनी संवाद साधला.

कोविड सेंटर दि- 8-6-2021 रोजी सुरू केले असून या ठिकाणाहून रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे, यावेळी हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील,गावकामकार पाटील श्री. दिलीप उर्फ मफत पाटील, युवानेते  प्रथमेश पाटील,अर्जुन जाधव ,पिंटु हुक्किरे,गिरीष पाटील,सचिन पाटील(इंजीनियर), तुळशीदास माने,जमिर मुल्ला, दस्तगीर जमादार,रावसाहेब पाटील,विकास माळी,धोत्रे सर, अविनाश सुतार,सर्व स्वयंसेवीका स्टाफ,व मफत पाटील युवा मंच चे कार्यकर्ते उपस्थित होते.....

Post a Comment

Previous Post Next Post