हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
मिळालेल्या माहितीनुसार मानसिंग दिनकर खोत वय वर्षे 48 हे राहणार खोतवाङी सकाळी घरातून 6 वाजता दैनंदिन प्रमाणे मार्नींग वाँक ला बाहेर पङले होते ते सांगली- इचलकरंजी रोङवरून व्यायाम करून घरी परतत असताना भंङारे पेट्रोल पंप येथे आले असता भरधाव चारचाकी गाङीने मानसिंग खोत यांना उङवले हि धङक इतकी जोरात होती कि मानसिंग खोत हे जागीच मृत्यूमूखी पङले हे समजताच अज्ञात व्यक्ती फरार झाला घटना समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होति घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला हि घटना समजताच खोत परिवारावर व मिञ परिवार यांच्या वर दुःखाचा ङोंगर कोसळला त्यांच्या जाणाने खोतवाङी गावात मोठी शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार होता