कारदगा जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रासाठी पाणीपुरवठा योजनेतून 8 लाखाचा निधी मंजूर - जि पं सदस्या सुमित्रा उगळे यांची माहिती.



हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

      

      कारदग्यासह जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या  ढोणेवाडी,मानकापूर गावात पिण्याच्या पाणी योजनेसाठी जिल्हा पंचायत सदस्या सौ सुमित्रा उगळे यांच्या विशेष प्रयत्नातून 8 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती स्वतः जिल्हा पंचायत सदस्या सौ सुमित्रा उगळे यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली.*

      *पुढे बोलताना सौ सुमित्रा उगळे म्हणाल्या की, कारदगा येथील ओसाड माळरानावर असलेल्या दड्डी प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी एक सुसज्ज हायटेक शौचालय उभारणीसाठी चार लाखाचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय ढोणेवाडी येथील बेघर वसाहत व बिरदेव मंदिर भागात जलकुंभ बांधकामासाठी जवळपास दीड लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तर मानकापूर येथे जलकुंभ व हजार फूट पाईप लाईन कामासाठी अडीच लाखाचा असा एकूण 8 लाखाचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे हि सांगितले.*

    *शिवाय येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनासाठी ही आपण 5 लाख निधी करून,उपलब्ध निधीतून कार्यालयीन जेवणासाठी सुसज्ज आसनव्यवस्था निर्माण करून विकास काम पूर्णत्वाला नेले असल्याचे ही माहिती दिली.*

        *जनतेने,जनतेच्या सेवेसाठी,जन कौलतून आपणास जनहित साधण्यासाठी लोक प्रतिनिधित्व दिले आहे.याची मी प्रामाणिक व निस्वार्थी कार्यातून पोहच दिली आहे.शिवाय पुढे जनहिताबरोबर सर्वांगिन विकास साधण्यासाठी अहोरात्र परिश्रम चालूच ठेवले असल्याचे सांगून, भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः सदैव कार्यरत असल्याचे यावेळी बोलताना जि पं सदस्या सौ सुमित्रा उगळे यांनी सांगितले.*

   *या प्रसंगी ग्राम पंचायत अध्यक्ष सुदीप उगळे,राजू किचडे सुभाष ठकाने,जोतिबा अलंकार,संतोष बुडके,राहुल रत्नाकर,संजय गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post