हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
सध्या संपूर्ण देशभरात धोरणामुळे अनेक संकट ओढवले आहे त्यात अनेक लोक मृत्युमुखी ही झालेले आहेत यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने विविध उपाय योजिले आहेत त्याच अनुषंगाने गुरुवारी 24 तारखेला होणाऱ्या वटपौर्णिमेला सर्व महिलांनी सोशल डिस्टन्स चे पालन करत तोंडाला मास्क लावून तसेच कोणतेही गर्दी न करता वटपौर्णिमा साजरी करावी असे मत माणुसकी फाउंडेशन च्या सौ स्वाती केर्ले यांनी व्यक्त केले*
*संपूर्ण राज्यामध्ये कोरणा हा अजूनही मोठ्या प्रमाणात असून सध्या जुलै-ऑगस्टमध्ये कोरणा ची तिसरी लाट येणार असून येणारा हा कोरोणा लहान मुलांसाठी अत्यंत घातक आहे असे सांगितले जात आहे त्यामुळे महिलावर्गाचा जास्त संपर्क हा लहान मुलांची होत असल्याने आपणच आपल्या मुलांसाठी घातक ठरू शकतो यासाठी महिलांनी यावेळी वटपोर्णिमा काळजीपूर्वक साजरी करावी व आपल्या कुटुंबाला ही सुरक्षित ठेवावे असे आवाहन माणुसकी फाउंडेशनच्या स्वाती केर्ले यांनी केले आहे*