यंत्रमाग कामगार सह इतर क्षेत्रातील कल्याण मंडळ स्थापन करण्याची संघटनांची मागणी



  हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                    

यंत्रमाग कामगार सह इतर क्षेत्रातील कामगारांचे कल्याण मंडळ स्थापन करा या व इतर मागण्यांसाठी आज कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजी येथील कामगार संघटनेच्या दारात शासनाच्या विरूध्द आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देखील कामगार सेना कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरूध्दा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र निकम इचलकरंजी शहर उपाध्यक्ष राहुल कडगावे महेश डागरे मच्छिंद्र सुळ मधुकर पाटील कुबेर सावंत सतिश सकपाळ इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व महिला कामगार उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post