असंघटीत कामगारांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात कामगार संघटना संयुक्त कृतीची लाल बावटा कार्यालय महत्वपुर्ण बैठक संपन्न



हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले            

कामगार संघटना सयुक्त क्रुती समितीची मीटिंग लालबावटा आफिसला घेण्यात आली या वेळी प्रमुख मागण्या यत्रमाग कामगार ऑटोलूम कामगार गारमेंट कामगार दिवानजी जॉबर काडीवाले वहीफणी सर्वच ऊधोगातील कामगारांना बाधकाम कामगारा प्रमाणे कोविडचे पधराशे रुपये अनुदान द्यावे व कामगार कल्याण मडंळ स्थापन करावे या व इतर मागण्या सरकार कडे करण्याचे ठरले जर सरकारने कामगारांच्या मागणी कडे लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचे ठरले या वेळी लालबावटा युनियनचे दत्ता माने भरमा काबळे सुभाष काबळे राष्ट्रवादी कामगार युनियनचे मदन मुरगूडे महाराष्ट्र कामगार सेनेचे राजेंद्र निकम राहुल कडगावे जनरल लेबर युनियनचे आनंदा गुरव श्रमीकचे कुंभार व बारवाडे नवक्रांतीचे बंडोपंंत सातपुते इटंकचे प्रदिप शाहू आयटकचे हणमंत लोहार शिवानंद पाटील इत्यादी उपस्थित होते.


अरिहंत सूत गिरणी कामगारांना जीवनावश्यक वस्तू वाटप,  संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी.    

  हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 

आज बोरगाव येथील अरिहंत सहकारी सूत गिरणीत अरिहंत शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ मीनाक्षी रावसाहेब पाटील यांच्या 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे 300 हून अधिक सूतगिरणी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, संचालक राजू मगदूम,अभयकुमार करोले, राजेश कार्वेकर ,बी. के.स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post