पृथ्वीराजसिंग राजपूत :
दत्तवाड:- (ता शिरोळ) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे . गुरुवारी सकाळी दत्तवाड- एकसंबा बंधारा पाण्याखाली गेला . कोरोनामुळे बंद असलेला दत्तवाड- एकसंबा बंधाऱ्यावरील चोरट्या वाहतुकीलाही ब्रेक लागला आहे .
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे . पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण बनले असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे . तळकोकणासह सर्वत्र मुसळधार पावसाने जोर धरल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे . नद्या दुथडी भरुन वहात असून दत्तवाड -एकसंबा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे .