दत्तवाड : युनूस लाडखान :
दत्तवाड : मा..प्रमोद दादा पाटील संस्थापक अध्यक्ष छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात कोरोना महामारीला रोखण्यासाठी कर्तव्याच्या भावणेतून आज प्राथमिक आरोग्य केंद्र सैनिक टाकळीस कोरोना १९ चे लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना देण्यासाठी ५०००० (पन्नास हजार) पॅरासिटेमोल गोळ्या मा.श्री.प्रमोद दादा पाटील यांचे बंधू छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.श्री.अविनाश पाटील आणि छत्रपती उद्योगसमूह चेअरमन मा.श्री. दयानंद खानोरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्याप्रसंगी टाकळी प्रा.आ.केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.ऐनापुरे मॅडम,संपर्क प्रमुख किरण गोते (बाबा) तालुका प्रमुख मा.श्री. संदीप पवार साहेब मा.श्री.विजय सावंत साहेब, मा.श्री.संदीप बिरणगे साहेब, मा.श्री. नितीन इंगळे साहेब, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रा.आ.केंद्र टाकळीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सदर मदत मिळवण्यासाठी प्रा.आ.केंद्र टाकळीचे आरोग्य सहाय्यक श्री अमोल कोळी यांनी विशेष प्रयत्न केले तसेच त्यांना जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राजश्री शाहू पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला